Wednesday, September 2, 2009

पण शब्द माझ्या हाती केवळ...

जीव गुंतताना तुझ्यात ... आसवेही न माझी राहिली
प्रीत होऊनी एका क्षणी.. तव मेघातूनी बरसली...

आसवातुनी ओघळूनी प्रीत तुझी... माझ्यावरीही वाहिली...
गंधाळलो मी, स्पर्शाने तव... माझे 'मी'पण हरवूनी

अक्षरे मज बोलती ...ती अंध तुझ्या मायेपुढे...
पण शब्द माझ्या हाती केवळ... जे तुज द्याया उरे....

काव्यमेय...

No comments:

Post a Comment